मत्स्योदरी विद्यालय घुंगर्डे, हदगाव
आज संपन्न झालेल्या तालुकास्तरीय अखिल भारतीय विद्यार्थी विज्ञान भाषण स्पर्धेमध्ये कु.तनिष्का चोरमले या विद्यार्थिनीने "काँटम युगाची सुरुवात: संभाव्यता व धोके" या विषयावर सादरीकरण करून तालुक्यात 51 गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला, तिची जिल्हास्तरीय विद्यार्थी विज्ञान मेळाव्यामध्ये निवड झाली.
मत्स्योदरी ज्ञानमंदिर प्राथमिक शाळा, अंबड
उत्तम विचार आणि चांगल्या सवयी विकसित करण्यासाठी वाचन हा सर्वोत्तम मार्ग असून वाचनाची सवय जोपासण्यासाठी विद्याध्यर्थ्यांनी दररोज एक गोष्टीचे पुस्तक वाचावे, आणि दुसऱ्या दिवशी ते आपल्या मित्रांना किंवा वर्गमित्रांना सांगावे, आपल्या घरी छोटेखानी वाचनालय तयार करावे, असे आवाहन मुख्याध्यापक लक्ष्मण कोळकर यांनी केले.
उत्तम विचार विकसित करण्यासाठी वाचन हा सर्वोत्तम मार्ग : कोळकर
जालना
अंकुशराव टोपे महाविद्यालयाचा विद्यार्थी ओंकार वाघ याची १९ वर्षाखालील क्रिकेट संघात अष्टपैलू खेळाडू म्हणून निवड झाली. महाराष्ट्राचा अंडर १९ संघ निवडण्यासाठी सर्वप्रथम जिल्हा पातळीवर आंतरमहाविद्यालयीन क्रिकेट स्पर्धेत, छत्रपती संभाजीनगर येथील विभागीय क्रिकेट स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावून संघाने भरीव कामगिरी केली होती..